SHOCKING : वजन उचलल्यानंतर धाडकन कोसळली वेटलिफ्टर

टोरंटोमध्ये सुरु असलेल्या 'पॅन अॅम गेम्स 2015'मध्ये एक वेटलिफ्टर एका मोठ्या अपघातापासून थोडक्यात वाचली. बेशुद्ध होऊन जागेवरच कोसळलेल्या या वेटलिफ्टरनं यानंतरदेखील सिल्व्हर मेडल आपल्या नावावर नोंदवलंय. 

Updated: Jul 15, 2015, 09:36 AM IST
SHOCKING : वजन उचलल्यानंतर धाडकन कोसळली वेटलिफ्टर title=

टोरंटो : टोरंटोमध्ये सुरु असलेल्या 'पॅन अॅम गेम्स 2015'मध्ये एक वेटलिफ्टर एका मोठ्या अपघातापासून थोडक्यात वाचली. बेशुद्ध होऊन जागेवरच कोसळलेल्या या वेटलिफ्टरनं यानंतरदेखील सिल्व्हर मेडल आपल्या नावावर नोंदवलंय. 

व्हेनेझुएलाची 20 वर्षांची वेटलिफ्टर जेनसिस रोड्रिगेज गोमेज 106 किलोच्या 'क्लीन अॅन्ड जर्क' प्रयत्न करत असताना शुद्ध हरपून धाडकन जमिनीवर कोसळली... वजन तिच्या मागे पडल्यामुळे मोठ्या दुखापतीपासून ती वाचली.

106 किलो वजन जेनसिसनं पहिल्याच प्रयत्नात उचललं. त्यानंतर तिनं तो खांद्यापर्यंत उचलून धरला. काही वेळ थांबून हे वजन तिनं डोक्याच्या वर नेण्याचा प्रयत्न केला. यात ती यशस्वीही झाली... पण, काही सेकंदातच ती खाली कोसळली आणि वजन तिच्या मागच्या बाजुला पडलं. पण, यापूर्वीच तीनं 53 किलोच्या तीन राऊंडस् पूर्ण केल्या होत्या.

महत्त्वाचं म्हणजे, यानंतरही जेनसिसनं याच वजनात दुसरा राऊंड पूर्ण केला आणि त्यानंतर 109 किलोचा राऊंडही पूर्ण केला. या स्पर्धेत जेनसिसला सिल्व्हर मेडल मिळालं. 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.