मला उचकवू नका, नाहीतर...

टी 20 वर्ल्ड कपमधल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचआधी वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. या मॅचआधी विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या संघाला इशारा दिला आहे.

Updated: Mar 26, 2016, 07:36 PM IST
मला उचकवू नका, नाहीतर...  title=

मोहाली: टी 20 वर्ल्ड कपमधल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचआधी वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. या मॅचआधी विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या संघाला इशारा दिला आहे.

या मॅचवेळी मला उचकवायचा प्रयत्न करु नका, तसंच माझ्यावर स्लेजिंग करू नका, कारण मला उचकवलं तर मी आणखी चांगला खेळतो असं कोहली म्हणाला आहे. तसंच स्लेजिंग केलं आणि आगीत तेल ओतायचा प्रयत्न केलात तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे सांगायलाही कोहली विसरला नाही. 

गेल्या काही दिवसांमध्ये कोहली आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये मैदानात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ऍडलेडमधल्या टी 20 मध्ये स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यानंतर कोहलीनं त्याला चिडवलं होतं. तसंच जेम्स फॉकनरबरोबरही त्याची बाचाबाची झाली होती. 

रविवारी होणाऱ्या या मॅचमध्ये जो जिंकणार त्यालाच सेमी फायनलचं तिकीट मिळणार आहे, त्यामुळे या सामन्याकडे सगळ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे.