सामना संपताच मैदानावर विराटने कोणाला केला कॉल?

आयपीएलमधील दिल्ली डेअरडेविल्सविरुद्धच्या सामन्यात विराटने जबरदस्त खेळ करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले. 

Updated: May 23, 2016, 03:04 PM IST
सामना संपताच मैदानावर विराटने कोणाला केला कॉल? title=

मुंबई : आयपीएलमधील दिल्ली डेअरडेविल्सविरुद्धच्या सामन्यात विराटने जबरदस्त खेळ करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले. 

सामना जिंकल्यानंतर विराटने मैदानावरच कोणालातरी फोन लावला आणि तो बोलू लागला. यावेळी तो लाईट मूडमध्ये दिसत होता. 

कोणाला कॉल केला होता विराटने 

दिल्ली डेअरडेविल्सविरुद्धच्या सामन्यात विराटने ५४ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर विराटने मैदानावरच कॉल केला आणि तो फोनवर बोलू लागला. त्याचे हावभाव पाहून तो विजयाचा आनंद समोरच्या व्यक्तीशी शेअर करत असल्याचे दिसत होते. दरम्यान, तो कोणाशी बोलत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

विराटचा दमदार खेळ आणि संघाचा विजय

संपूर्ण सामन्यादरम्यान विराट जोशमध्ये दिसत होता. सुरुवातीला क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर फलंदाजीतही त्याने कमाल केली. विराटने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ शतके झळकावलीत. आतापर्यंत १४ सामन्यात त्याने ९१९ धावा केल्यात.