मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा कॅप्टन विराट कोहलीवर आयपीएलमध्ये एका मॅचची बंदी यायची शक्यता आहे. 7 मे ला पुण्याविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये ओव्हरची गती राखली नाही तर कोहलीवर ही कारवाई करण्यात येईल.
याआधी झालेल्या दोन मॅचमध्ये बैंगलोरच्या संघानं ओव्हरची गती ठेवली नाही, त्यामुळे कोहलीकडून पहिले 12 लाख आणि नंतर 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.
पुण्याविरुद्ध 22 एप्रिलला झालेली मॅच आणि सोमवारी कोलकत्याविरुद्धच्या मॅचमध्ये बैंगलोरच्या बॉलर्सच्या ओव्हरची गती कमी होती. आता पुन्हा ही चूक झाली तर तर कोहलीवर 30 लाख रुपयांचा दंड आणि एक सामन्याची बंदी येऊ शकते.