बॅटींगला जाण्यापूर्वी विराट इतर खेळाडूंना काय बोलून गेला

कागांरुचं आव्हान संपूष्टात आणणाऱा विराट कोहली काय बॅटींगला जाण्यापूर्वी काय बोलून गेला याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता असेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात सावध सुरुवात केली पण भारताच्या ३ विकेट लवकर पडल्या आणि सगळेच चिंतेत आले..

Updated: Mar 28, 2016, 11:11 PM IST
बॅटींगला जाण्यापूर्वी विराट इतर खेळाडूंना काय बोलून गेला title=

मुंबई : कागांरुचं आव्हान संपूष्टात आणणाऱा विराट कोहली काय बॅटींगला जाण्यापूर्वी काय बोलून गेला याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता असेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात सावध सुरुवात केली पण भारताच्या ३ विकेट लवकर पडल्या आणि सगळेच चिंतेत आले..

भारताला विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीने इतर बॅट्समनला काय बोलून गेला याबाबत आशिष नेहरा याने सांगितलं आहे. भारतासमोर १६० रन्सचं टार्गेट होतं ते मोठं वाटत नसलं तरी ३ विकेट लवकर पडल्यानंतर भारताची स्थिती निश्चितच बिकट झाली होती.

विराटने खेळ सांभाळला आणि त्याला युवराज आणि धोनीने देखील चांगली साथ दिली. २ विकेट पडल्यानंतर जेव्हा विराट बॅटींगला निघाला तेव्हा तो बोलला की, 'हा टी-२० आहे, १० ते १२ रनरेटच्या हिशोबाने बदल काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही आरामात बसा' 

नेहराने म्हटलं की, मी अनेक मोठे खेळाडू पाहिले आहे जे हळू हळू प्रगती करतात पण विराटच्या मागील ३ वर्षात मोठा बदल झालाय. तुम्ही त्याची स्टाईल बघा. बॅलेंस्ड डाईट करतो, तुम्ही त्याच्या सोबत जेवायला गोलात तर तुम्हाला फक्त बॉईल जेवन मिळेल.