मुंबई: सचिन तेंडुलकरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे विनोद कांबळी गेले काही दिवस चर्चेमध्ये आला आहे. सचिनबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन कांबळीवर मोठ्या प्रमाणावर टीकाही करण्यात आली होती.
सचिनचा मुलगा अर्जुन आणि कांबळीचा मुलगा जिसस क्रिस्टियानोनं भारताकडून खेळावं, अशी इच्छा ट्विटरवरच्या कांबळीच्या फॉलोअरनं व्यक्त केली. याला कांबळीनं प्रत्युत्तर दिलं.
अर्जुन हा मला आपल्या मुलासारखा आहे, पहिले त्यानं मुंबईकडून खेळावं, त्यानंतर देशासाठी खेळावं असं कांबळी म्हणाला आहे. तर माझा मुलगा खेळाडू व्हावा ही माझी इच्छा आहे, पण त्याला त्याचं करियर निवडायची मुभा असल्याचंही कांबळी म्हणाला आहे.
As for ArjunTendulkar he's no les thn a son to me, I'd first like him to don d mumbai colours n then d Indian team. https://t.co/JUgfg1L7zo
— VINOD KAMBLI (@vinodkambli349) 28 April 2016
For Jesus-Christiano I, As a father, would like him to b a good sportsman, ultimately would leave the choice to him https://t.co/JUgfg1L7zo
— VINOD KAMBLI (@vinodkambli349) 28 April 2016
गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये कांबळी आपल्या मुलासोबत आला होता.