विनोद खन्नांऐवजी टॅग केल्यानं विनोद कांबळी भडकला

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्नांचं दिर्घ आजारानं निधन झालं आहे. विनोद खन्नांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारी अनेक ट्विटस करण्यात आली.

Updated: Apr 27, 2017, 08:16 PM IST
विनोद खन्नांऐवजी टॅग केल्यानं विनोद कांबळी भडकला  title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्नांचं दिर्घ आजारानं निधन झालं आहे. विनोद खन्नांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारी अनेक ट्विटस करण्यात आली. पण एका ट्विटर यूजरनं विनोद खन्नांना टॅग करण्याऐवजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला टॅग केलं.

या ट्विटमुळे संतापलेल्या विनोद कांबळीनं चाहत्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. विनोद खन्नांबद्दल मला आदर आहे. पण ज्यानं माझं नाव टॅग केलं त्याला देव शिक्षा देईल, असं ट्विट कांबळीनं केलं. यानंतर कांबळीनं या चाहत्याला ब्लॉकही केलं. हे ट्विट करणाऱ्यानं नंतर माफीही मागितली पण या सगळ्या प्रकारानंतर कांबळीला मात्र ट्विटरवर चांगलंच ट्रोल केलं गेलं.