विनेश फोगटच्या मांडीचे लिगामेंट फाटले

विनेश फोगटच्या मांडीचे लिगामेंट फाटल्याचं वैद्यकीय तपासणीनंतर सांगण्यात आले, विनेश फोगटला पूर्ण बरं होण्यासाठी २ आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे.

Updated: Aug 18, 2016, 08:02 PM IST
विनेश फोगटच्या मांडीचे लिगामेंट फाटले title=

रिओ : विनेश फोगटच्या मांडीचे लिगामेंट फाटल्याचं वैद्यकीय तपासणीनंतर सांगण्यात आले, विनेश फोगटला पूर्ण बरं होण्यासाठी २ आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे.

विनेश फोगटविषयी ही माहिती, भारतीय संघाचे पथक प्रमुख राकेश गुप्ता यांनी दिली आहे.

'तिच्या हाडाला दुखापत झालेली नाही. गुडघ्याचे लिगामेंट फाटले आहे, त्यासाठी योग्य तो आधार देण्यात आला आहे. सांधा निखळल्याचे कुठेही निष्पन्न झालेले नाही. १-२ आठवड्यांत ती तंदुरुस्त होईल,' असं राकेश गुप्ता यांनी म्हटले आहे.

विनेश फोगट ४८ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीसाठी खेळत होती,  मात्र सून यानान हिच्याविरुद्ध खेळताना झटापटीत तिच्या मांडी आणि गुडघ्याच्या मधोमध जोरदार धक्का बसला, तिचा पाय पूर्णपणे वाकला होता. यामुळे २१ वर्षाची विनेश पदक आणेल, ही आशा मावळली आहे.

विनेश घटनेनंतर ५ मिनिटे ती रिंगेतच पडून होती. त्यानंतर तिला स्ट्रेचरवरून नेण्यात आले. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या सूत्रानुसार तिला नीट चालण्यासाठी अजून २-३ दिवस लागतील. सुरवातीला तिला चालण्यासाठी आधार घ्यावा लागत असल्याचं सांगण्यात येत आहे.