राजकोट : आयपीएलमध्ये एकाच दिवशी दोन हॅट्रिक पाहायला मिळाल्या. आरसीबीचा सॅम्युअल बद्री आणि गुजरात लायन्सचा अॅन्ड्रू टायनं हॅट्रिक घेतल्या.
बद्रीनं मुंबई इंडियन्सच्याविरुद्ध तर टायनं पुण्याविरुद्ध हा कारनामा केला.
बद्रीनं घेतलेल्या हॅट्रिकचा आरसीबीला फायदा झाला नाही. पोलार्डच्या फटकेबाजीमुळे मुंबईनं ही मॅच ४ विकेट्सनं जिंकली तर गुजरातनं पुण्याविरुद्धची मॅच ७ विकेट्सनं जिंकली. टायनं त्याच्या ४ ओव्हर्समध्ये १७ रन्स देऊन पुण्याच्या ५ बॅट्समनना आऊट केलं तर बद्रीनं ४ ओव्हर्समध्ये ९ रन्स देऊन ४ विकेट्स घेतल्या.