आघाडीच्या १६ टेनिसपटूंकडे संशयाची सुई

 टेनिसमधील मॅच फिक्‍सिंगच्या गौप्य स्फोटामुळे अवघे टेनिस विश्‍व हादरून निघाले. क्रिकेट, फुटबॉलपाठोपाठ टेनिसमध्ये देखील ‘फिक्‍सिंग’चे वारे वाहू लागल्याने क्रीडा विश्‍वात सुनामी आली आई. याबाबतीत जागतिक क्रमवारीतील पहिल्या पन्नासमधील आघाडीच्या सोळा टेनिसपटूंकडे संशयाची सुई आहे. 

Updated: Jan 19, 2016, 11:10 AM IST
आघाडीच्या १६ टेनिसपटूंकडे संशयाची सुई title=

लंडन :  टेनिसमधील मॅच फिक्‍सिंगच्या गौप्य स्फोटामुळे अवघे टेनिस विश्‍व हादरून निघाले. क्रिकेट, फुटबॉलपाठोपाठ टेनिसमध्ये देखील ‘फिक्‍सिंग’चे वारे वाहू लागल्याने क्रीडा विश्‍वात सुनामी आली आई. याबाबतीत जागतिक क्रमवारीतील पहिल्या पन्नासमधील आघाडीच्या सोळा टेनिसपटूंकडे संशयाची सुई आहे. 

संशयाची सुई असलेल्या सोळा टेनिसपटूंमध्ये काही ग्रॅंड स्लॅम विजेते असल्याचीही चर्चा जोरात आहे. बीबीसी आणि बजफीड या संस्थेने काही गुप्त कागदपत्रांचा आधार घेत हे वृत्त दिले आहे. टेनिसच्या अव्वल स्तरावर फिक्‍सिंगसारखे प्रकार घडत असल्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचेही म्हटले आहे. 

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचा पहिला दिवसच मुळी टेनिसमधील फिक्‍सिंगच्या बातमीने उजाडला. ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या मोसमाची सुरवात ऑस्ट्रेलियन स्पर्धेने होत असतानाच हे वादळ आलं आहे.