वर्ल्डकपच्या तिकीटविक्रीला आजपासून सुरुवात

भारतात ८ मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटविक्रीला आज दुपारपासून सुरुवात झालीये. आयसीसीच्या पोर्टलवरुन मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. 

Updated: Feb 24, 2016, 02:15 PM IST
वर्ल्डकपच्या तिकीटविक्रीला आजपासून सुरुवात title=

नवी दिल्ली : भारतात ८ मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटविक्रीला आज दुपारपासून सुरुवात झालीये. आयसीसीच्या पोर्टलवरुन मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. 

बुकमायशो वरुन तुम्ही ही तिकीटे बुक करु शकता. भारताच्या मॅचेस आणि सेमीफायनल तसेच फायनल सामन्यांची तिकीटांचा यामध्ये समावेश असणार नाही. दुपारी १२ वाजल्यापासून या तिकीटांची विक्री सुरु झालीये.

दरम्यान, भारतीय संघाच्या चार मॅचेस, सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यांची तिकीटे ऑनलाईन पद्धतीने लॉटरी सिस्टीमद्वारे बुक केली जाणार आहेत.