स्टिव्ह स्मिथचा पुणेरी अवतार

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला पाच तारखेपासून सुरुवात होत आहे. याआधी सगळेच खेळाडू त्यांच्या आयपीएल टीममध्ये दाखल होऊन मजा मस्ती करताना दिसत आहेत. 

Updated: Apr 3, 2017, 09:39 PM IST
स्टिव्ह स्मिथचा पुणेरी अवतार  title=

पुणे : आयपीएलच्या दहाव्या मोसमाला पाच तारखेपासून सुरुवात होत आहे. याआधी सगळेच खेळाडू त्यांच्या आयपीएल टीममध्ये दाखल होऊन मजा मस्ती करताना दिसत आहेत. आयपीएलच्या पुण्याच्या टीमचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथही अशाच मूडमध्ये पाहायला मिळत आहे.

डोक्यावर पुणेरी पगडी आणि खास पुणेरी कपडे घातलेला स्मिथचा फोटो पुण्याच्या टीमनं ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अजिंक्य रहाणेही स्मिथबरोबर दिसत आहे. अजिंक्यनं मात्र पुण्याच्या टीमची जर्सीच घातली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजवेळी कॅप्टन स्टिव्ह स्मिथनं बरेच वाद ओढावून घेतले होते. कोहली आणि भारतीय टीमवर टीका केल्यामुळे स्मिथ भारतामध्ये व्हिलन बनला होता.