सिंधूकडून ऑलिम्पिकचा बदला, सुपर सीरिजमध्ये मारिनचा पराभव

दुबई वर्ल्ड सुपर सीरिज फायनलमध्ये भारताच्या पी.व्ही.सिंधूनं कॅरोलिन मारिनचा पराभव करून सेमी फायनल गाठली आहे.

Updated: Dec 16, 2016, 10:12 PM IST
सिंधूकडून ऑलिम्पिकचा बदला, सुपर सीरिजमध्ये मारिनचा पराभव title=

दुबई : दुबई वर्ल्ड सुपर सीरिज फायनलमध्ये भारताच्या पी.व्ही.सिंधूनं कॅरोलिन मारिनचा पराभव करून सेमी फायनल गाठली आहे. सिंधूनं मारिनचा 21-17, 21-13 असा पराभव केला आहे.

ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये मारिननं सिंधूचा पराभव केला होता. यामुळे सिंधूला ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. पण या पराभवाचा वचपा सिंधूनं या सीरिजमध्ये काढला आहे. ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच मारिन आणि सिंधू समोरासमोर आल्या होत्या. आत्तापर्यंत मारिन आणि सिंधू नऊ वेळा एकमेकांसमोर आल्या आहेत. यापैकी पाच मॅचमध्ये मारिनचा आणि चार मॅचमध्ये सिंधूचा विजय झाला आहे.