शोएब अख्तर पाकिस्तानी टीमवर भडकला

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पाकिस्तानी टीममधल्या खेळाडूंवर चांगलाच भडकला होता.

Updated: May 11, 2016, 06:06 PM IST
शोएब अख्तर पाकिस्तानी टीमवर भडकला title=

मुंबई: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पाकिस्तानी टीममधल्या खेळाडूंवर चांगलाच भडकला होता. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवरच्या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या शोएबनं मिसबाह उल हक, युनुस खान आणि कोच वकार युनुसवर गंभीर आरोप केले. 

मिसबाह उल हक हा सगळ्यात स्वार्थी आहे. मिसबाह आणि युनुस खाननं आधीच निवृत्त व्हायला पाहिजे होतं, असं शोएब म्हणाला. तसंच कोच असलेला वकार युनुस फक्त स्वत:लाच वाचवायचा विचार करतो, असा आरोपही शोएब अख्तरनं केला. 

पाहा शोएब अख्तरचे आरोप