टीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवन माघारी

टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन श्रीलंकेविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये उर्वरित दोन टेस्ट मॅच खेळू शकणार नाहीय. शिखर धवनला पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान हाताला दुखापत झाल्यानं त्याला बाकीच्या सामन्यात खेळता येणार नाही.

Updated: Aug 17, 2015, 06:33 PM IST
टीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवन माघारी title=

नवी दिल्ली: टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन श्रीलंकेविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये उर्वरित दोन टेस्ट मॅच खेळू शकणार नाहीय. शिखर धवनला पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान हाताला दुखापत झाल्यानं त्याला बाकीच्या सामन्यात खेळता येणार नाही.

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये शिखर धवनच्या उजव्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्यानं त्याला या दुखापतीपासून बरं होण्यासाठी काही दिवस विश्रांतीची गरज आहे. त्यामुळं श्रीलंकेतील उर्वरित दोन टेस्ट मॅचमधून त्याला माघार घेण्याचा सल्ला त्याला देण्यात आला असून आता तो विश्रांतीसाठी भारतात येणार असल्याचं समजतंय. 

दरम्यान, शिखर धवननं पहिल्या टेस्ट मॅचमध्ये शानदार सेंच्युरी केली होती. मात्र, तरीही या मॅचमध्ये भारताला ६३ रन्सनी निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेनं तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.