सेरेनाला विम्बल्डनचे जेतेपद

अमेरिकेची अव्वल सीडेड सेरेना विल्यम्सनं विम्बल्डनच्या खिताबावर आपलं नाव कोरलं. 

Updated: Jul 10, 2016, 08:41 AM IST
सेरेनाला विम्बल्डनचे जेतेपद title=

मुंबई : अमेरिकेची अव्वल सीडेड सेरेना विल्यम्सनं विम्बल्डनच्या खिताबावर आपलं नाव कोरलं. 

सेरेनाने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अँजेलिका कर्बरवर 7-5, 6-3 अशा दोन सरळ सेटमध्ये मात करत विजेतेपद पटकावले. 

विजेतेपदासह सेरेनानं टेनिस करिअरमधील 22 व्या ग्र्ँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. त्याचप्रमाणे स्टेफी ग्राफच्या 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाच्या रेकॉर्डचीही तिनं बरोबरी केली.