ब्राझील-जर्मनीमध्ये सेमी फायनलचा पहिला मुकाबला

ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. 

Updated: Jul 8, 2014, 11:08 PM IST
ब्राझील-जर्मनीमध्ये सेमी फायनलचा पहिला मुकाबला title=

ब्राझील : ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. 

स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्याने ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.

ब्राझीलने जर्मनीविरुद्धच्या सेमी फायनलपूर्वी कॅप्टन थियागो सिल्वावरील निलंबन मागे घेण्याची फिफाकडे विनंत केल्याने वर्ल्ड कपमध्ये नवा विवाद सुरु झालाय. 

ब्राझील फुटबॉल संघटनेनेच ही मागणी केलीय. त्यांच्या मते सिल्वाला कार्ड देन चुकीच होत. त्याला सेमी फायनलमध्ये खेळण्याची परवानगी द्यायला पाहिजे. याचबरोबर नेमारला झालेल्या दुखापतीचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.