'सेहवागला टीममध्ये परत एन्ट्री मिळवण्याच्या एक नाही अनेक मिळाल्या'

सिलेक्टर्सनं मला ड्रॉप करणार असं आधीच सांगितलं असतं तर मी दिल्लीत २०१३ साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्येच निवृत्ती जाहीर केली असती, असं वक्तव्य करणाऱ्या क्रिकेटर विरेंद्र सेहवागवर आता सिलेक्टर्स चांगलेच बरसलेत. 

Updated: Nov 3, 2015, 09:38 AM IST
'सेहवागला टीममध्ये परत एन्ट्री मिळवण्याच्या एक नाही अनेक मिळाल्या' title=

मुंबई : सिलेक्टर्सनं मला ड्रॉप करणार असं आधीच सांगितलं असतं तर मी दिल्लीत २०१३ साली झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्येच निवृत्ती जाहीर केली असती, असं वक्तव्य करणाऱ्या क्रिकेटर विरेंद्र सेहवागवर आता सिलेक्टर्स चांगलेच बरसलेत. 

'झी मीडिया'शी बोलताना एका मुलाखतीत वीरुनं हे वक्तव्य केलं होतं. त्यावर, प्रतिक्रिया देताना नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर एका सिलेक्टरनं सेहवागच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलंय. 

अधिक वाचा - 2007 मध्येच निवृत्तीचा विचार होता, पण सचिननं रोखलं - वीरेंद्र सेहवाग

सेहवागनं जे म्हटलंय त्यावर आम्हाला धक्काच बसला. त्याचं असं म्हणणं की फेअरवेल मॅच खेळण्याची विनंती केली होती आणि आम्ही त्याला ड्रॉप करण्याबद्दल सांगायला हवं होतं, यावरून हे स्पष्ट दिसतं की त्यानं आपलं करिअर आता संपलंय हे स्वत: मान्य केलं होतं... तसंच एखाद्या खेळाडूला पुढच्या वेळी निवडलं जाणार नाही, हे आधीच सांगण्याचा कोणताही अधिकार सिलेक्टर्सकडे नसतो...' असं या सिलेक्टरनं म्हटलंय. 

'कोणताही खेळाडू मोठा स्कोअर उभारून टीममध्ये स्थान मिळवून शकतो... आणि आम्हीदेखील याकडे लक्ष ठेवतो. एकच टेस्ट का? सेहवागला स्कोअर करण्याच्या आणि टीममध्ये परतण्याच्या अनेक संधी मिळाल्या...' असंही या सिलेक्टरनं म्हटलंय. 

व्हिडिओ : निवृत्ती घेतल्यानंतरही वीरूनं मारले छक्के - पंजे... इथे पाहा वीरूची संपूर्ण मुलाखत

'मलाही करिअरच्या टॉपवर असतानाच निवृत्ती घ्यायला आवडली असती... चांगलं खेळत असतानाच निवृत्ती जाहीर करावी ही प्रत्येक क्रिकेटरचीच इच्छा असते... मलाही निवृत्तीच्या वेळी भाषण देता आलं असतं... पण, नशिबात काही वेगळंच होतं' असं सेहवागनं झी न्यूजशी बोलताना म्हटलं होतं.

अधिक वाचा - 'पुढच्या वर्ल्डकपपर्यंत धोनीनंच कॅप्टन्सी सांभाळावी'

सेहवागनं आपल्या 37 व्या वाढदिवसाच्या दिवशी 20 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.