सानियाला वेध... नंबर वनचे!

रॅकेट स्पोर्टसमध्ये आता अजून एक हैदराबादी बाला नंबर वनचं शिखर गाठण्यासाठी सज्ज झालीय. सायना नेहवालनंतर आता सानिया मिर्झालाही अव्वल स्थान खुणावतय. टेनिस स्टार सानिया डबल्समध्ये सध्या तिसऱ्या स्थानी असून अव्वल स्थानी पोहचण्यासाठी तिला आता केवळ 145 पॉईंटसची गरज आहे. 

Updated: Apr 8, 2015, 03:24 PM IST
सानियाला वेध... नंबर वनचे! title=

मुंबई : रॅकेट स्पोर्टसमध्ये आता अजून एक हैदराबादी बाला नंबर वनचं शिखर गाठण्यासाठी सज्ज झालीय. सायना नेहवालनंतर आता सानिया मिर्झालाही अव्वल स्थान खुणावतय. टेनिस स्टार सानिया डबल्समध्ये सध्या तिसऱ्या स्थानी असून अव्वल स्थानी पोहचण्यासाठी तिला आता केवळ 145 पॉईंटसची गरज आहे. 

बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालनंतर आता टेनिस प्लेअर सानिया मिर्झाही नंबर वन स्थानी पोहचण्यासाठी आतूर झालीय. सानिया मिर्झा ही टेनिस स्टार सध्या डबल्समध्ये धमाका करतेय. याचमुळे ती आता वेगानं अव्वल स्थानकडे झेप घेत आहे. सानिया मिर्झा आणि तिची डबल्सची जोडीदार मार्टीना हिंगिसने डबल्समध्ये नुकतचं मियामी ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली. या दोघींनी सलग दुसऱ्या विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर वर्ल्ड रँकिंगमध्ये सानियानं 7 हजार 495 पॉईंट्ससह तिसरं स्थानही पटकावलं तर मार्टीना चौथ्या स्थानी आहे. आता सानियाला वेध लागले आहेत ते अव्वल स्थानाचं...

सध्या इटलीची सारा ईरानी ही 7640 पॉईटंसह अव्वल स्थानी आहे तर इटलीलीच रॉबेट्रा विन्सीदेखील 7640 पॉईट्ंसह अव्वल स्थानी आहे. तर तिसऱ्या स्थानावर 7496 पॉईंट्ससह सानिया मिर्झा विराजमान झालीय. सानियाची जोडीदार मार्टीना हिंगिस ही 6115 पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे.

आता सानियाला अव्वल स्थान पटकावण्यासाठी 145 पॉईंट्सची गरज असून नंबर वन स्थानी विराजमान होण्यासासाठी फॅमिली सर्कल कपच्या डबल्समध्ये विजय मिळवावा लागेल. चार्ल्सस्टन इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत सानिया-मार्टिनाला अव्वल सीडिंग देण्यात आलंय. ही स्पर्धा ग्रीन क्लेवर खेळण्यात येणार असून दोघींनाही या सरफेसवर खेळण्यासी सवय नसल्याने त्यांच्यासाठी ही स्पर्धा थोडी आव्हानात्मकच ठरणार आहे. मात्र सानियाने 2011मध्ये या स्पर्धेत विजय मिळवला असल्याने सानियासाठी ही जमेचीच बाजू ठरणार आहे. सानियासाठीदेखील नंबर वनचं स्थान म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखंच आहे. 

नंबर वनचं स्थान हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. मात्र, यामुळे मी दबावाखाली खेळणार नाही. मला आशा आहे की या आठवड्यात मी नंबर वनचं स्थान काबिज केरल एवढी क्षमता माझ्यात आहे, असं सानियानं म्हणतेय. 

आता सायना नेहवालनंतर सानिया मिर्झाचंदेखील नंबर वनचं स्वप्न पूर्ण व्हावं अशीच इच्छा सानियाचे फॅन्स बाळगून असतील. आता भारतीय क्रीडा चाहत्यांनाही  फुलराणीनंतर टेनिस सम्राज्ञीची प्रतिक्षा देशवासियांना लागून राहिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.