शोएबने ´त्याच्या’ कानाखाली मारायला हवे होते – सानिया मिर्झा

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये वेस्ट इंडीजचा फास्ट बोलर टिनो बेस्टशी भांडणानंतर आपला पती क्रिकेटर शोएब मलिकच्या पाठीशी उभी राहिली आहे. सानियाने ट्विटरवर लिहिले की, मला वाटते की शोएबने त्यावेळी टिनोच्या कानाखाली मारायला हवी होती. किंगस्टन ओव्हल मैदानात टी-२० सामन्यात शोएब आणि टिनो यांचे भांडण हाणामारीपर्यंत वाढले होते. 

Updated: Jul 25, 2014, 05:34 PM IST
शोएबने ´त्याच्या’ कानाखाली मारायला हवे होते – सानिया मिर्झा title=

नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये वेस्ट इंडीजचा फास्ट बोलर टिनो बेस्टशी भांडणानंतर आपला पती क्रिकेटर शोएब मलिकच्या पाठीशी उभी राहिली आहे. सानियाने ट्विटरवर लिहिले की, मला वाटते की शोएबने त्यावेळी टिनोच्या कानाखाली मारायला हवी होती. किंगस्टन ओव्हल मैदानात टी-२० सामन्यात शोएब आणि टिनो यांचे भांडण हाणामारीपर्यंत वाढले होते. 

सानिया म्हणाली, क्रिकेटच्या मैदानावर वंशभेदी टिप्पणी करणे निंदास्पद आहे. मला माहीत आहे, शोएबने त्याला मारले नाही. मला वाटते की त्याला एक कानाखाली मारायला हवी होती. #टिनो बेस्ट #इडियट'

सेंटी लुसियाकडून खेळणाऱ्या शोएबने ४९ धावा काढल्या आणि ड्वेन स्मिथ (नाबाद ११०) सह महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पण बेस्टला दोन चौकार लगावल्यावर बेस्ट आणि शोएबचे भांडण झाले. दोघांनी केवळ मैदानावर एकमेकांना शिव्या दिल्या पण हे भांडण हॉटेलमध्येही सुरू होते. सीपीएल आयोजकांनी या घटनेला किरकोळ म्हटले, पण खेळाडूंवर सामन्याच्या फीचा मोठा दंड लावला. शोएबचे अर्धे मानधन तर बेस्टचे ६० टक्के मानधन कापून घेण्यात आले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.