सानिया-बोपन्ना सेमी फायनलमध्ये, ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर

भारतीय टेनिस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नानं रिओ ऑलिम्पिकच्या सेमी फायनलच्या प्रवेश निश्चित केला आहे. 

Updated: Aug 13, 2016, 08:19 AM IST
सानिया-बोपन्ना सेमी फायनलमध्ये, ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर  title=

रिओ: भारतीय टेनिस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नानं रिओ ऑलिम्पिकच्या सेमी फायनलच्या प्रवेश निश्चित केला आहे. सानिया-बोपन्नानं  6-4, 6-4 नं ब्रिटीश जोडी अँडी मरे आणि हेदर वॉटसनचा धुव्वा उडवत सेमी फायनल गाठली. 

अवघ्या 67 मिनिटांत त्यांनी मरे-वॉटसन जोडीवर मात केली. आता सानिया-बोपन्ना जोडी ऑलिम्पिक मेडलपासून केवळ एक पाऊल दूर आहे. सेमी फायनल जिंकत फायनलमध्ये प्रवेश करण्याचं लक्ष्य आता या जोडीचं असणार आहे.