ऐतिहासिक : सानिया वर्ल्ड टेनिसमध्ये अव्वलस्थानी

 'फेमिनी सर्कल कप' आपल्या नावावर नोंदवून सानिया वुमन डबल्समध्ये जगातील नंबर वनची खेळाडू ठरलीय. तसंच हा बहुमान मिळवणारी सानिया ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. 

Updated: Apr 12, 2015, 10:07 PM IST
ऐतिहासिक : सानिया वर्ल्ड टेनिसमध्ये अव्वलस्थानी title=

मुंबई : 'फेमली सर्कल कप' आपल्या नावावर नोंदवून सानिया वुमन डबल्समध्ये जगातील नंबर वनची खेळाडू ठरलीय. तसंच हा बहुमान मिळवणारी सानिया ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. 

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीनं चार्लेस्टन, अमेरिका इथं सुरु असलेल्या फेमली सर्कल कपच्या फायनलमध्ये विजय मिळवलाय. फायनलमध्ये सानिया-हिंगिस जोडीचा मुकाबला केसी डेलाक्युआ-डारिजा जुराक या जोडीशी झाला. 

टूर्नामेंटमधली या विजयासोबतच सानिया वुमन्स डबल्समध्ये जगातील नंबर वन खेळाडू ठरलीय... टेनिसमधील हा एक ऐतिहासिक क्षणच म्हणावा लागेल. टूर्नामेंटमधील ही फायनल मॅच भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री झाली.

नंबर वनचं स्थान हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. मात्र, यामुळे मी दबावाखाली खेळणार नाही. मला आशा आहे की या आठवड्यात मी नंबर वनचं स्थान काबिज केरल एवढी क्षमता माझ्यात आहे, असा आत्मविश्वासही सानियानं ही मॅच जिंकण्या अगोदर व्यक्त केला होता.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.