श्रीलंकेचा संगकारा यंदाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू

श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराला यंदाच्या सीएट सर्वोत्तम क्रिकेटपटू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

Updated: May 26, 2015, 08:31 PM IST
श्रीलंकेचा संगकारा यंदाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू title=

मुंबई : श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराला यंदाच्या सीएट सर्वोत्तम क्रिकेटपटू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

संगकारानंतर सर्वात चर्चेत आला तो रोहित शर्मा कारण, २०१४-१५ वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २६४ धावा झळकावणारा भारताचा फलंदाज रोहित शर्माला या वेळी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. 

भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अजिंक्य रहाणेला या वेळी सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू हा पुरस्कार देण्यात आला.

वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डला या वेळी लोकप्रिय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला.

श्रीलंकेने या वर्षी दमदार कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला, त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानलाही पराभूत केले. 

या वर्षभरात आठ कसोटी सामन्यांमध्ये १,०५२ धावा संगकाराने केल्या आहेत, त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ३५ सामन्यांमध्ये सात शतकांच्या जोरावर १,७५४ धावा फटकावल्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.