चीन: भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं चायना ओपन सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेचा किताब जिंकलाय. सायनानं अंतिम फेरीच्या रोमहर्षक लढतीत जपानच्या अकेन यामागुचीचा २१-१२, २२-२० असा पराभव केला.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहाव्यांदा सहभागी झालेल्या सायनानं उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारित १७ व्या स्थानावर असलेल्या लिऊ शिनचा २१-१७, २१-१७ असा ४७ मिनीटांत पराभव केला.
लिऊने ७-४ अशी आघाडी घेतली, परंतु सायनानं गुण मिळवण्याचा सपाटा लावताना ११-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी १९-१३पर्यंत वाढली. मग लिऊने आणखी चार गुण मिळवल्यानंतर सायनाने विजय पटकावला.
दरम्यान, भारताचा आज चीनमध्ये डबल धमाका केलाय. चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायनापाठोपाठ पुरुष एकेरीत भारताच्या के. श्रीकांतनेही विजेतेपेद पटकावलं.
स्पर्धेच्या फायनलमध्ये श्रीकांत किदांबीनं चीनचा ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन लिन डॅनवर सनसनाटी विजय मिळवला. श्रीकांतने हा सामना २१-१९, २१-१७ असा खिशात घातला.
श्रीकांत किदांबीचं कारकीर्दीतील हे पहिलंच सुपर सीरीज जेतेपद आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.