जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सचिन, विराट करणार वृक्षारोपण!

देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण अभियानात सहभागी होणार आहे. पर्यावरण मंत्रालयानं त्यासंबंधीचं निमंत्रण त्यांना पाठवलंय.

Updated: Jun 4, 2015, 11:06 AM IST
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सचिन, विराट करणार वृक्षारोपण! title=

नवी दिल्ली: देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण अभियानात सहभागी होणार आहे. पर्यावरण मंत्रालयानं त्यासंबंधीचं निमंत्रण त्यांना पाठवलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या निवासस्थानी वृक्षारोपण करणार आहेत. विराट कोहली आणि कुस्तीपटू सुशीलकुमार पर्यावरण मंत्रालयाच्या आवारात वृक्षारोपण करून पंतप्रधानांसोबतच अभियानाची सुरूवात करतील.

तर भारतरत्न सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा हे मुंबईत वृक्षारोपण करून अभियानात सहभागी होणार असल्याची माहिती, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलीय.

दुसरीकडे बडोदामध्ये क्रिकेटर इरफान आणि युसूफ पठाण हे देखील या अभियानात सहभागी होतील. शिवाय क्रिकेटर्ससोबतच बॉक्सर मेरी कोम आणि सरिता देवी यांच्यासह इतरही खेळाडू या अभियानात भाग घेणार आहेत.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सचिनसह झी २४ तासनंही पुढाकार घेतलाय. आपणही वृक्षारोपण करा आणि झाडासोबतचा सेल्फी झी २४ तासला पाठवा. त्यासाठी @zee24taas लिहून फेसबुकवर अपलोड करा आणि .या अभियानात सहभागी व्हा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.