मुंबई : झिम्बाबेविरोधातील एका सामन्यात सचिनची विकेट घेतल्यानंतर झिम्बाबेचा बॉलर ओलंगाने यथेच्छ उड्या मारल्या होत्या, ओलंगाला अख्ख ग्राऊंड उड्या मारायला अपूर्ण पडतं की काय असं वाटत होतं?
ओलंगाचा हा असुरी आनंद सचिनच्या कानावर नंतर आला असावा, तेव्हा ओलंगाचा बॉलर म्हणून क्रिकेटमध्ये दबदबा वाढत होता.
मात्र म्हणतात ना बकरे की माँ कब तक खैर मनाएगी, दुसऱ्या सामन्यात सचिनने ओलंगाला असा धू-धू धुतला की ओलंगाला घाम पुसावा, रडावं, की बॉलिंग करावी, बॉलिंग केली तर कसा बॉल टाकावा हे काहीही कळत नव्हतं, सचिन तेंडुलकरने आपल्या बॅटच्या फटकाऱ्यांनी ओलंगाला रडवलं होतं. यावेळेस सचिनसोबत सौरव गांगुली मैदानावर होता.
पाहा हा क्षण, हा क्षण नाही बघितला तर क्रिकेटमध्ये काय पाहिलं?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.