... आणि मैदानातच दिसलं विराटच्या डोळ्यांत पाणी!

चेन्नई सुपरकिंग्जनं इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला रोमांचक सामन्यात तीन विकेटसनं पराभवाचा दणका दिलाय. यामुळेच, चेन्नईला तब्बल सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळालंय. 

Updated: May 23, 2015, 02:24 PM IST
... आणि मैदानातच दिसलं विराटच्या डोळ्यांत पाणी! title=

नवी दिल्ली : चेन्नई सुपरकिंग्जनं इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला रोमांचक सामन्यात तीन विकेटसनं पराभवाचा दणका दिलाय. यामुळेच, चेन्नईला तब्बल सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळालंय. 

मॅच हरल्यानंतर बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहलीला अनावर दु:ख झालं... मैदानातच त्याच्या डोळ्यांत पाणी दिसलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आणखीन २० रन्स बनवले असते तर ही मॅच त्यांना जिंकता आली असती. 


पराभवानंतर विराट कोहली

'आयपीएल सीझन ८'मध्ये बंगळुरू विरुद्ध चेन्नईत झालेल्या तीन मॅचमध्ये हा चेन्नईचा तिसरा विजय आहे. या दरम्यान टीमचे सगळेच खेळाडू निराशेत दिसले. 

चेन्नईविरुद्ध हे खूप छोटं लक्ष्य होतं. १३९ रन्सचं टार्गेट डिफेन्ड करणं फारसं कठिण नव्हतं. सेमीफायनलमध्ये पोहचणं हीच आमच्यासाठी चांगली गोष्ट होती. आम्ही ज्या पद्धतीनं खेळलो त्यासाठी खेळाडुंचं कौतुक करायला हवं, असं म्हणत विराट कोहलीनं मॅच नंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.