स्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्माला १२ लाख दंड़

 मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला. 

Updated: Apr 21, 2015, 01:40 PM IST
स्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्माला १२ लाख दंड़ title=

बंगळुरू :  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला. 

टुर्नामेंट्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल आचारसंहितेत स्लो ओव्हर टाकल्याप्रकरणी या सीझनमध्ये पहिल्यांदा रोहितला दोषी ठरविण्यात आले. त्यामुळे त्याला १२ लाख रूपये दंडाची शिक्षा देण्यात आली. 

या पुढे असे पुन्हा झाले तर त्याला एक सामन्यांची बंदीला सामोरे जावे लागेल. 

रोहित शर्माने १५ चेंडूत ४२ धावा बनविल्या होत्या. पाच सामन्यामध्ये बंगळुरू विरूद्ध आणि आयपीएल आठ मधील पहिला विजय आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.