नवी दिल्ली: आयपीएलच्या सामन्यांमध्ये चीअर लीडर्सची भूमिका खेळासोबत वाढत जात आहे. मात्र या चीअर लीडर्सबाबत कोणालाही जास्त माहिती नसते.
प्रत्येक चौकार-षटकारावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या चीअर लीडर्स अनेकदा वादात सापडल्या आहेत. आता एका चीअर लीडरनं आपलं म्हणणं सार्वजनिकरित्या माडलं आहे. या मुलीच्या मते चीअर लीडर्सना वाईट नजरेनं पाहिलं जातं.
रेडिट्स आस्क मी एनिथिंगवर लाईव्ह चॅटिंगच्या दरम्यान नाव जाहीर न करता या चीअर लीडरनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या दरम्यान तिला विचारण्यात आलं की, मॅच दरम्यान तुम्हाला वाईट नजरेनं पाहिलं जातं त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं? त्यावर तिनं सांगितलं की पूर्ण वेळ असं पाहिलं जातं तेव्हा मला खूप राग येतो.
जास्तीत जास्त चीअर लीडर्स विदेशी असतात. मात्र तिचं असं म्हणणं आहे की, भारतीय चीअर लीजर्सनाही सहभागी करून घ्यावं. मात्र तसं होत नाही. एखाद्या विदेशी चीअर लीडरचा करार संपल्यावर पुन्हा विदेशी मुलीलाच तिच्या जागी घेतलं जातं.
जास्त डान्स करावा लागू नये, यासाठी आपल्या संघाचा फलंदाज लवकर आउट व्हावा यासाठी तुम्ही प्रार्थना करता का? या प्रश्नावर बोलतांना तिनं सांगितलं की, आमचा संघ जिंकावा असं आम्हाला नेहमी वाटत असतं. इथं येण्यापूर्वी मला क्रिकेट आवडत नव्हतं. मात्र आता माझी आवड बदलली आहे.
पुढे बोलतांना तिनं सांगितलं की, सगळ्या चिअर लीडर्स बाजारू नसतात. हे लोकाचं चुकीचं मत आहे. मी चीअर लीडर्ससोबत काम केलं आहे. सर्वाधिक महिला सन्मानित आहेत. चीअर लीडर्स वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या आहेत. काही नर्स आहेत, काही लायब्ररिअन आहेत. काही खाजगी कंपन्यामध्ये कामं करतात. मी स्वत: आयपीएल बंद असतांना बॉलिवूड संबधित कामं करते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.