फिट होण्याच्या नादात विराट 'मैदानाबाहेर'?

रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान विराट कोहलीला मैदानात अचानक चक्कर येऊ लागली. त्यानंतर कोहलीने मैदानाबाहेर जाण्याच्या निर्णय घेतला, अशी माहिती समोर आली आहे. 

Updated: May 12, 2015, 01:48 PM IST
फिट होण्याच्या नादात विराट 'मैदानाबाहेर'? title=

मुंबई : रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्या दरम्यान विराट कोहलीला मैदानात अचानक चक्कर येऊ लागली. त्यानंतर कोहलीने मैदानाबाहेर जाण्याच्या निर्णय घेतला, अशी माहिती समोर आली आहे. 

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विराटने एबी डिविलियर्ससोबत गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. विराटने त्याच्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली. मात्र त्यानंतर मैदानात असं काही घडलं की, कोणालाच काही कळलं नाही. 

एवढी उत्कृष्ट फलंदाजी केल्यानंतर फिल्डिंगदरम्यान विराटने अचानक मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. कारण फिल्डिंग करतांना विराटला चक्कर आली होती. असं विराटसोबत मैदानात पहिल्यांदाच झालंय. त्यामुळे त्याने मैदानातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

स्लिम होण्याच्या नादात विराट आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं जातंय. फिट होण्याच्या नादात तो आपल्या खाण्या-पिण्याकडे नीटसं लक्ष देत नाही, त्याचा परिणाम असा दिसून आलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.