दिग्गज क्रिकेटपटूंचे नावडते रेकॉर्ड

सचिन तेंडुलकर, सर डॉन ब्रॅडमन, सनथ जयसूर्या यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. पण आपल्या कारकिर्दिमध्ये त्यांनी काही असेही रेकॉर्ड बनवले आहेत, जे त्यांनाही पसंत पडणार नाहीत.

Updated: May 12, 2016, 08:20 PM IST
दिग्गज क्रिकेटपटूंचे नावडते रेकॉर्ड title=

मुंबई: सचिन तेंडुलकर, सर डॉन ब्रॅडमन, सनथ जयसूर्या यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. पण आपल्या कारकिर्दिमध्ये त्यांनी काही असेही रेकॉर्ड बनवले आहेत, जे त्यांनाही पसंत पडणार नाहीत.

वनडेमध्ये सर्वाधिक वेळा शून्यवर आऊट

कोणत्याही बॅट्समनला शून्यवर आऊट व्हायला कधीच आवडत नाही. मग सर्वाधिक वेळा शून्यवर आऊट झाल्याचा विक्रम तर त्याला अजिबातच आवडणार नाही. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यवर आऊट व्हायचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. 445 मॅचमध्ये खेळलेला जयसूर्या 34 वेळा शून्यवर आऊट झाला आहे. यापैकी 10 गोल्डन डक म्हणजेच 10 वेळा जयसूर्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला आहे. 

नर्व्हस नाईंटीजमध्ये आऊट होणारा खेळाडू

90 रन बनवल्यावर सगळ्याच बॅट्समनचं लक्ष असतं ते सेंच्युरी मारण्यावर. पण नव्वदीमध्ये असतानाच आऊट होण्याचं दु:ख क्रिकेटपटूला सगळ्यात जास्त बोचत असेल. 90 ते 99 रनवर असताना सर्वाधिक वेळा आऊट व्हायचा रेकॉर्ड आहे सचिन तेंडुलकरच्या नावावर. सचिन 28 वेळा 90 ते 99 मध्ये आऊट झाला आहे. 

सर्वाधिक वेळा रन आऊट झालेला खेळाडू

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा रन आऊट होण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेच्या मार्वन अट्टापट्टूच्या नावावर आहे. 259 वनडे खेळलेला अट्टापट्टू 41 वेळा रन आऊट झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड आणि इंझमाम उल हक आहेत. हे दोघंही वनडे क्रिकेटमध्ये 40-40 वेळा रन आऊट झाले आहेत. 

सर्वाधिक बोल्ड होणारा खेळाडू

मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावावर क्रिकेटमधली बरीच रेकॉर्ड आहेत, पण सर्वाधिक वेळा बोल्ड व्हायचं रेकॉर्डही त्याच्याच नावावर आहे. सचिन एकूण 114 वेळा बोल्ड झाला, यामध्ये 66 टेस्ट आणि 48 टेस्टचा समावेश आहे. 

टेस्ट क्रिकेटमधली सगळ्यात महाग ओव्हर

टेस्ट क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन देण्याचा रेकॉर्ड आहे इंग्लंडचा दिग्गज फास्ट बॉलर जेस्म अंडरसनच्या नावावर. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये जॉर्ज बेलीनं अंडरसनच्या एकाच ओव्हरमध्ये 28 रन काढल्या होत्या. 

शेवटच्या टेस्टमध्ये शून्यवर आऊट

टेस्ट क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन यांचं रेकॉर्ड सर्वोत्तम होतं. पण शेवटच्या टेस्टमध्ये ब्रॅडमन शून्यवर आऊट झाले, त्यामुळे त्यांची टेस्ट क्रिकेटमधली सरासरी झाली 99.94. ब्रॅडमन यांनी एक रन जरी काढली असती तरी त्यांची सरासरी 100 झाली असती.