मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा सध्या गंभीर झालाय... आपल्या खेळाबाबत नाही तर त्याच्याबाबतीत मीडियात येणाऱ्या बातम्यांबद्दल...
रवींद्र जडेजानं एका न्यूजपेपरच्या एडिटरविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करत ५१ करोड रुपये नुकसान भरपाईची मागणी केलीय.
प्रिनिस्पल सीनियर सिव्हिल जज पीबी परमार यांनी 'अबतक'चे एडिटर आणि मालक सतीश मेहता यांना याबद्दल समन्स धाडलंय. त्यांना ४ फेब्रुवारी रोजी कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
रवींद्र जडेच्याच्या म्हणण्यानुसार, या वर्तमानपत्रानं २० नोव्हेंबर २०१४ रोजी आपल्या एका बातमीत जडेजा आणि त्याचा बिझनेस पार्टनर जे. अजमेर यांच्यावर बाली डांगरशी संबंध असल्याचं म्हटलंय. बाली डांगर याच्यावर जमीन लाटण्याचे आणि खंडणी मागण्याचे आरोप आहेत.
जडेजाचे वकील हिरेन भट यांच्या म्हणण्यानुसार, या वर्तमानपत्रानं कोणतीही खातरजमा न करता अजमेरा हे जडेजाच्या रेस्टोरंटमध्ये भागीदार असल्याचं म्हटलंय. परंतु, अजमेरा कोणत्याही बिझनेसमध्ये जडेजासोबत नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.