गुलाबी चेंडूने द्विशतक ठोकणारा पहिला बॅटसमन

 गुलाबी चेंडूनं खेळताना द्विशतक ठोकणारा जगातला पहिला फलंदाज होण्याचा मान पुजाराने पटकावला आहे.

Updated: Sep 12, 2016, 12:22 PM IST
गुलाबी चेंडूने द्विशतक ठोकणारा पहिला बॅटसमन title=

नवी दिल्ली:  गुलाबी चेंडूनं खेळताना द्विशतक ठोकणारा जगातला पहिला फलंदाज होण्याचा मान पुजाराने पटकावला आहे.

टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारानं दुलीप करंडकाच्या अंतिम फेरीत द्विशतक साजरं करत हा विक्रम आपल्या नावावर केला.

ग्रेटर नॉएडा स्पोर्टस क्लबच्या मैदानात  इंडिया ब्लू संघाकडून इंडिया रेड संघाविरुद्ध खेळताना पुजारानं हा पराक्रम गाजवला.

पुजाराने ३०३ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावलं. त्यानं 363 चेंडूंमध्ये 28 चौकारांसह नाबाद 256 धावांची खेळी केली.

या खेळीसह पुजाराने टीकाकारांना चोख प्रत्युतर दिलंय आणि आपण टीम इंडियातील स्थानाचे दावेदार असल्याचं सिद्ध केलंय.