म्हणून पोलार्ड आजच्या मॅचमध्ये नाही

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा फॉर्म म्हणावा तसा चांगला नाही. त्यातच हैदराबादविरुद्धच्या मोठ्या मॅचआधी मुंबईचा स्टार खेळाडू पोलार्ड ही मॅच खेळत नाहीये.

Updated: Apr 18, 2016, 08:38 PM IST
म्हणून पोलार्ड आजच्या मॅचमध्ये नाही title=

हैदराबाद: यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा फॉर्म म्हणावा तसा चांगला नाही. त्यातच हैदराबादविरुद्धच्या मोठ्या मॅचआधी मुंबईचा स्टार खेळाडू पोलार्ड ही मॅच खेळत नाहीये. फूड पॉयजनिंगमुळे पोलार्डला हा सामना मुकावा लागला. त्याच्याऐवजी मुंबईनं मार्टिन गप्टीलला संघामध्ये स्थान दिलं, पण त्यालाही फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. गप्टीलला 4 बॉलमध्ये 2 रन बनवून आऊट झाला. 

याआधी लसिथ मलिंगा आणि लिएंडल सिमन्स दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून आऊट झाल्यानं मुंबईला मोठा धक्का बसला आहे, त्यामुळे मागच्या वर्षीचे चॅम्पियन असलेली मुंबई पोलार्ड लवकर बरा होईल अशीच अपेक्षा करत आहे.