'रणजीच्या मॅच दोन पिचवर खेळवा'

रणजी ट्रॉफीच्या प्रत्येक मॅच या दोन वेगवेगळ्या पिचवर खेळवण्यात याव्यात असा सल्ला सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयला दिला आहे.

Updated: Dec 3, 2016, 06:14 PM IST
'रणजीच्या मॅच दोन पिचवर खेळवा' title=

नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीच्या प्रत्येक मॅच या दोन वेगवेगळ्या पिचवर खेळवण्यात याव्यात असा सल्ला सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयला दिला आहे. अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या पिचवर मॅच खेळवल्याचा फायदा भारतीय संघाला परदेश दौऱ्यात होईल, असं मतही सचिननं व्यक्त केलं आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये जातो तेव्हा त्यांना कोकाबुरा बॉलनं खेळावं लागतं. भारतात एसजी बॉलनं खेळल्यामुळे नव्या क्रिकेटपटूंना कोकाबुरा बॉलनं खेळणं अवघड जातं, अशी प्रतिक्रिया सचिननं दिली आहे.

रणजी क्रिकेटच्या प्रत्येक मॅचची पहिली इनिंग कोकाबुरा बॉलनं खेळवली तर ओपनिंग बॅट्समनपुढे आव्हान उभं राहिल. बॉलरनाही याचा फायदा मिळेल आणि स्पिनर्सनाही कोकाबुरा बॉलवर कशी बॉलिंग करायची हे शिकायला मिळेल, असं सचिन म्हणाला आहे.

रणजी ट्रॉफीमधली प्रत्येक मॅचची पहिली इनिंग कोकाबुरा बॉलनं हिरव्या खेळपट्टीवर खेळावी आणि दुसरी इनिंग एसजी बॉलनं फिरणाऱ्या खेळपट्टीवर खेळवावी. यामुळे भारतातल्या खेळाडूंना दोन्ही पिचवर आणि दोन्ही बॉलनी खेळण्याचा अनुभव मिळेल तसंच टॉसही कमी महत्त्वाची भूमिका बजावेल असं सचिनला वाटत आहे. नवी दिल्लीमध्ये झालेल्या हिंदुस्तान टाईम्स समिटमध्ये सचिननं बीसीसीआयला हा सल्ला दिला आहे.