नेमारच्या पेनल्टी कीकने ब्राझीलला सुवर्णपदक

नेमारने ब्राझीलला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.  ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने पेनल्टी कीकवर गोल केला आणि ब्राझीलला ऑलिंपिकमधील पहिले सुवर्णपदक मिळालं.  ब्राझीलने अंतिम सामन्यात जर्मनीवर पेनल्टी शूट आऊटमध्ये ५-४ असा विजय मिळविला.

Updated: Aug 21, 2016, 11:30 AM IST
नेमारच्या पेनल्टी कीकने ब्राझीलला सुवर्णपदक title=

रिओ : नेमारने ब्राझीलला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.  ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने पेनल्टी कीकवर गोल केला आणि ब्राझीलला ऑलिंपिकमधील पहिले सुवर्णपदक मिळालं.  ब्राझीलने अंतिम सामन्यात जर्मनीवर पेनल्टी शूट आऊटमध्ये ५-४ असा विजय मिळविला.

ब्राझील आणि जर्मनी यांच्यातील हा अंतिम सामना निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत १-१ असा बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटमध्ये लागला. अखेरच्या किकवर नेमारने गोल झळकावून ब्राझिलचा ५-१ असा विजय निश्चित केला. 

पाचवेळच्या विश्वविजेत्या ब्राझिलला आजवर एकदाही ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकता आले नव्हते.  ब्राझीलने १९८४, १९८८आणि २०१२ सालच्या ऑलिंपिकमध्ये अंतिम सामन्यात धडक मारली होती, पण पराभवाचा सामना करावा लागला होता.

जर्मनीने २०१४च्या फुटबॉल विश्वकरंडकात ब्राझीलवर ७-१ असा दणदणीत विजय मिळविला होता. त्यामुळे ब्राझीलला या सामन्यातून पराभवाची परतफेड करण्याची संधी होती. ब्राझीलने ही संधी न दवडता कर्णधार नेमारच्या नेतृत्वाखाली जर्मनीचा पराभव करत पहिल्यांदाच ऑलिंपिकचे सुवर्णपदक मिळविले.