हॅमिल्टन: ऑस्ट्रेलियाची पराभवाची मालिका सुरुच आहे. भारतानं टी-20मध्ये 3-0 नं दारुण पराभव केल्यानंतर आता न्यूझिलंडनंही ऑस्ट्रेलियाला वनडे सीरिजमध्ये 2-1नं हरवलं आहे. हॅमिल्टनमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये न्यूझिलंडनं ऑस्ट्रेलियाचा 55 रन्सनं पराभव केला आणि ब्रॅण्डन मॅक्कलमला गोड निरोप दिला. मॅकल्लमच्या कारकिर्दीतली ही शेवटची वनडे होती.
या वनडेमध्ये न्यूझिलंडनं ऑस्ट्रेलियापुढे 247 रनचं आव्हान ठेवलं, पण ऑस्ट्रेलियाचा संघ 44 व्या ओव्हरमध्ये 191 रन वर ऑल आऊट झाला. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला, आणि न्यूझिलंडला 246 रनवर रोखलं. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शनं सगळयात जास्त 3 विकेट घेतल्या, तर न्युझिलंडकडून मार्टिन गुप्टील आणि ग्रँट एलियटनं हाफ सेंच्युरी झळकावली.
247 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना समाधानकारक कामगिरी करता आली नाही, उस्मान ख्वाजानं सगळ्यात जास्त 44 रन केल्या. तर हेन्रीनं कांगारूंच्या सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, आणि चॅपेल-हेडली ट्रॉफी न्यूझिलंडन आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवलं.