... आणि ब्राझिलयन जनेतेच्या अश्रूंना बांध फुटला

यजमान ब्राझिलियन टीमला वर्ल्ड कपमध्ये चौथ्या स्थानावरच समाधान मानाव लागलं आहे. नेदरलँड्सनं ब्राझिलियन टीमचा 3-0 नं धुव्वा उडवला. 

PTI | Updated: Jul 13, 2014, 09:01 AM IST
... आणि ब्राझिलयन जनेतेच्या अश्रूंना बांध फुटला title=

ब्रासिलिया: यजमान ब्राझिलियन टीमला वर्ल्ड कपमध्ये चौथ्या स्थानावरच समाधान मानाव लागलं आहे. नेदरलँड्सनं ब्राझिलियन टीमचा 3-0 नं धुव्वा उडवला. 

नेजरलँड्सच्या टीमनं जबरदस्त खेळ करत ब्राझिलियन टीमला पराभवाची चव चाखायला लावली. ऑरेंज आर्मीच्या टीमकडून कॅप्टन रॉबिन वॅन पर्सी, डेले ब्लाईंड आणि जिओर्जिनिओने गोल केले. यजमान टीमला या मॅचमध्ये एकही गोल झळकावता आला नाही. आणि सांबा टीमला वर्ल्ड कपमध्ये आपला शेवट गोड करण्यात अपयश आलं. 

ब्राझिलियन टीम पराभूत झाल्यानं त्यांच्या चाहत्यांमध्ये घोर निराशा पसरली. ब्राझिलच्या सपोटर्सना आपले अश्रूही यावेळी अनावर झाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.