बंगळुरु टीममधून मिचेल स्टार्क आऊट तर नवा बॉलर इन

आयपीएल सीझन ९ मध्ये चांगल्या कामगिरीनंतर ही बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागतोय. बंगळुरुचे बॅट्समन चांगले परफॉर्मस करतायंत पण बॉलर कुठे तरी कमी पडतायंत. 

Updated: Apr 26, 2016, 09:54 PM IST
बंगळुरु टीममधून मिचेल स्टार्क आऊट तर नवा बॉलर इन title=

मुंबई : आयपीएल सीझन ९ मध्ये चांगल्या कामगिरीनंतर ही बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागतोय. बंगळुरुचे बॅट्समन चांगले परफॉर्मस करतायंत पण बॉलर कुठे तरी कमी पडतायंत. 

आरसीबीने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कसोबत बॉलिंगला सुरुवात केली होती पण स्टार्क टी-20 वर्ल्डकपमध्ये दुखापतीमुळे बाहेर झाला होता. तो अजून ही फिट झालेला नाही त्यामुळे आयपीएल सीझन ९ मधून ही तो बाहेर झाला आहे.

आरसीबीने आता स्टार्कच्या जागी वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या क्रिस जॉर्डनला टीममध्ये संधी दिली आहे. जॉर्डनच्या जबरदस्त कामगिरीमुळेच इंग्लंड फायनलमध्ये पोहोचला होता. आता त्याच्या कामगिरीवर बंगळुरू चांगल्या स्थितीत येईल अशी चाहत्यांना आशा असेल.