बंगळुरू : रांचीमधली तिसरी टेस्ट सुरु होण्याआधीच कांगारूंना आणखी एक धक्का बसला आहे. मिचेल मार्शनंतर आता ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कलाही दुखापत झाली आहे. मिचेल स्टार्कच्या उजव्या पावलाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.
बंगळुरूमधल्या दुसऱ्या टेस्टवेळीच स्टार्कच्या पायाला दुखापत झाली होती. दुखापत थांबत नसल्यामुळे स्टार्कचा पाय स्कॅन करण्यात आला. यावेळी त्याचं पाऊल फ्रॅक्चर झाल्याचं लक्षात आलं.
१६ मार्चपासून रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे. पुण्यामधली पहिली टेस्ट कांगारूंनी जिंकल्यावर भारतानंही जोरदार कमबॅक करत बंगळुरू टेस्टमध्ये विजय मिळवला. पण तिसऱ्या टेस्टआधीच महत्त्वाचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे ऑस्ट्रेलियापुढची आव्हानं आणखी खडतर झाली आहेत.