आयपीएल -९ : या दिग्गज खेळाडूंना कोणी घेतलंच नाही

आयपीएलसाठी शनिवारी खेळाडूंवर बोली लावून त्यांना वेगवेगळ्या संघाने विकत घेतलं. युवराज आणि वॉटसनवर मोठी बोली लागली तर अनेक दिग्गज खेळांडूंवर बोलीच लागली नाही.

Updated: Feb 7, 2016, 09:23 AM IST
आयपीएल -९ : या दिग्गज खेळाडूंना कोणी घेतलंच नाही title=

बंगळूरु : आयपीएलसाठी शनिवारी खेळाडूंवर बोली लावून त्यांना वेगवेगळ्या संघाने विकत घेतलं. युवराज आणि वॉटसनवर मोठी बोली लागली तर अनेक दिग्गज खेळांडूंवर बोलीच लागली नाही.

न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज मार्टीन गुप्टील, ऑस्ट्रेलियाचा पूर्व कॅप्टन जॉर्ज बेली, दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला, महेला जयवर्धने, माईकल हसी आणि ब्रॅड हॉडिन या दिग्गज खेळांडूंवर बोलीच लागली नाही. 

वेस्टइंडिजचा डेरेन सॅमी, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आणिआस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा, डेविड हसी, अॅडम वोजेस आणि भारतचा मुनाफ पटेल यांच्याकडे खरेदीदारांनी पाठ फिरवली.