भारत वि. ऑस्ट्रेलिया वनडेत तुटले अनेक रेकॉर्ड

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये झालेल्या पहिल्या वनडेत अनेक रेकॉर्ड जुने रेकॉर्ड मोडले.

Updated: Jan 12, 2016, 09:34 PM IST
भारत वि. ऑस्ट्रेलिया वनडेत तुटले अनेक रेकॉर्ड title=

पर्थ : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये झालेल्या पहिल्या वनडेत अनेक रेकॉर्ड जुने रेकॉर्ड मोडले गेले. दोघांमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत भारताचा ५ विकेटने पराभव झाला. पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आज नेमके कोणत्या रेकॉर्ड बनले.

भारताचे रेकॉर्ड :

१. ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मॅचमध्ये भारताने आज सगळ्यात जास्त रन्स केलेत. याआधी २०१४ मध्ये भारताने ऑस्ट्रेलिया विरोधात ब्रिस्बेनमध्ये ३०३ रन्स बनवले होते.

२. ऑस्ट्रेलियामध्ये रोहित शर्माने ३ शतक लगावत लक्ष्मणची बरोबरी केली.

३. रोहित शर्माने विराट कोहली सोबत २०७ रन्सची पार्टनरशिप केली. जी ऑस्ट्रेलिया विरोधातली २ ऱ्या विकेटसाठीची आत्तापर्यंतची सर्वात मोठी पार्टनरशिप आहे. याआधी कॅरेबियनच्या हेंस आणि रिचर्ड्सच्या नावावर हा रेकॉर्ड होता. १९७९ मध्ये दोघांनी २०५ रनची पार्टनरशिप केली.

४. १६३ बॉलमध्ये १७१ रन करणारा रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरोधात त्यांच्याच धरतीवर सर्वोच्च रन करणारा पहिला खेळाडू बनला आहे. शर्माने ३७ वर्ष जुना विवियन रिचर्ड्सचा १५३ रन्सचा रेकॉर्ड तोडला. 

५. रोहित शर्माने एका इनिंगमध्ये चौथ्यांदा १५० रन्सपेक्षा अधिक रन केले आहे. फक्त सचिन तेंडुलकर याच्या नावावर ५ वेळा १५० हून अधिक करण्याचा हा रेकॉर्ड आहे.

ऑस्ट्रलियाचे रेकॉर्ड : 

१. कप्तान स्टीवन स्मिथ आणि जार्ज बेली याने तिसऱ्या विकेटसाठी सगळ्यात मोठी पार्टनरशिप केली आहे. दोघांनी २४२ रन्सची पार्टनरशिप केली. याआधी २००३ मध्ये रिकी पाँटिग आणि डेमियन मार्टिन यांच्या नावावर २३४ रन्सचा रेकॉर्ड होता. 

२. ऑस्ट्रेलियासाठी १४९ रन करणारा स्मिथ हा तिसरा ऑस्ट्रेलियन कॅप्टन झाला आहे. याआधी पाँटिगने १६४ तर जार्ज बेलीने १५६ रन केले आहे.