नवी दिल्ली : आगामी 2015वर्ल्ड कपमध्येही बॉस डंकन फ्लेचर हेच मार्गदर्शन करतील, या कॅप्टन महेंद्र सिंग धोनीच्या विधानावर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केलीय.
कोच कोण असावा याचा निर्णय धोनी घेऊ शकत नाही. बीसीसीआय याबाबत निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या एका वरिष्ट अधिका-याने व्यक्त केलीय. याशिवाय वर्ल्ड कपसाठी कॅप्टन आणि कोच असेल याचा निर्णय सिलेक्शन कमिटी घेईल असही या अधिका-याने स्पष्ट केलं.
भारतीय कर्णधाराच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करीत बोर्डाने हा मुद्दा कार्यकारिणीत चर्चे घेण्याचा आग्रह धरला आहे. धोनीने ब्रिस्टल वन-डेच्या पूर्व संध्येला पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले होते. त्यावर बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
कर्णधाराने स्वत:ची मर्यादा ओलांडली, असे पदाधिकाऱ्यांचे मत आहे. कोचच्या कार्यकाळाचा निर्णय धोनीला करायचा नाही, असे त्यांचे आहे. धोनीच्या वक्तव्यामुळे एक बाब स्पष्ट झाली ती ही की कसोटी मालिकेत इंग्लंडकडून १-३ ने सपाटून मार खल्यानंतर रवी शास्त्री याला संघाचे संचालक नियुक्त करण्याआधी बसीसीआय आणि धोनी यांच्यात एकमत झाले नसावे. हा मुद्दा बोर्डाच्या पुढील कार्यकारिणीत याबाबत चर्चा करण्याचे सुतोवाच एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.