...म्हणून धोनीच्या स्टोरीतून वगळली 'ती' तीन नावं!

टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित 'एम एस धोनी... द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता...

Updated: Sep 27, 2016, 11:09 PM IST
...म्हणून धोनीच्या स्टोरीतून वगळली 'ती' तीन नावं! title=

मुंबई : टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित 'एम एस धोनी... द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता...

'ते' असे कोणते तीन खेळाडू होते ज्यांना धोनी संघात घेण्यास तयार नव्हता? हे या सिनेमात दिसेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती... पण ते तीन खेळाडू कोण असणार? हे आता गुपितचं राहणार आहे.

कारण या सिनेमात त्या तिन्ही खेळाडूंच्या नावाचा उच्चार करण्यात आलेला नाही. 'सिनेमातील एका सीनमधील आम्ही तीन खेळाडूंच नाव लपविण्याचा निर्णय घेतला आहे... जर ही नावं घेतली असती तर त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता होती... त्यामुळेच आम्ही धोनी आणि तिन्ही खेळाडूंच्या संमतीनं ही नावं वगळण्याचा निर्णय घेतला' अशी माहिती सिनेमाचा दिग्दर्शक नीरज पांडेने दिलीय.