...जेव्हा माहीनं आपल्या 'झिवा'ला पहिल्यांदाच घेतलं हातांत!

सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारल्यानंतर वर्ल्डकप २०१५ च्या युद्धातून बाहेर पडलेली टीम इंडिया आता भारतात परतलीय. 

Updated: Mar 28, 2015, 05:34 PM IST
...जेव्हा माहीनं आपल्या 'झिवा'ला पहिल्यांदाच घेतलं हातांत! title=

मुंबई : सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारल्यानंतर वर्ल्डकप २०१५ च्या युद्धातून बाहेर पडलेली टीम इंडिया आता भारतात परतलीय. 

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला भेटण्यासाठी त्याची पत्नी साक्षी धोनी मुंबई एअरपोर्टवर दाखल झाली होती. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे यावेळी साक्षीनं आपल्या चिमुकलीला - 'झिवा' हिलाही सोबत आणलं होतं... 


धोनी आणि झिवा

मुलीच्या जन्मानंतर परदेश तब्बल चार सलग परदेश दौऱ्यावर असलेल्या धोनीनं यावेळी पहिल्यांदाच आपल्या चिमुकलीला आपल्या हातांत घेतलं... त्यानं तिला उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि खूप सारे फोटोही काढले. 

काही वेळांतच धोनी आणि त्याच्या मुलीचे हे फोटो सोशल मीडियावर वायरल झालेत. या फोटोंमध्ये धोनी आपल्या चिमुकलीसोबत अत्यानंदी दिसतोय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.