नवी दिल्ली : बीसीसीआयच्या सध्याच्या सर्व अधिक-यांना हटवण्याची शिफारस लोढा समितीनं केली आहे. लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीवरुन लोढा समिती आणि बीसीसीआय यांच्यातील वाद आता टोकाला पोहचला आहे. शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणा-या बीसीसीआय आणि सलग्न संघटनांच्या सर्व वरिष्ठ अधिका-यांना हटवण्याची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे बीसीसीआयचा कारभार गृहसचिव जी.के.पिल्लईंकडे सोपवण्याची शिफारस लोढा समितीनं केली आहे. लोढा समितीनं शिफारशींच्या अंमलबजावणीचा नवा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला. त्यामुळे बीसीसीआयच्या बड्या पदाधिका-यांना आता दणका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.