इंग्लड वर्ल्ड कपमधून बाहेर, बांगलादेश क्वार्टर फायनलमध्ये

बांगलादेश Vs इंग्लंड

Updated: Mar 9, 2015, 05:35 PM IST
इंग्लड वर्ल्ड कपमधून बाहेर, बांगलादेश क्वार्टर फायनलमध्ये title=

अॅडलेड : बिग अपसेट करणारा संघ म्हणून ओळख असलेल्या बांगलादेशने आज इंग्लडचा १५ धावांनी पराभव करत इंग्लडला घऱचा रस्ता दाखविला आहे. 

यापूर्वी २०११ च्या वर्ल्ड कपमध्येही बांगलादेशने इंग्लडला नमवले होते. बांगलादेशच्या या विजयाने बांगलादेशने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.

अॅडलेडमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने इंग्लंडसमोर २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लडचा संघ अखेरच्या षटकात २६० धावांवर गारद झाला.

भारत - बांगलादेश क्वार्टर फायनल

भारताने आपल्या दोन पैकी एक सामना जिंकला तर भारत बी ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ होईल. तसेच बांगलादेशने पुढील आपला सामना गमावला तर आणि ऑस्ट्रेलियाने आपला अखेरचा सामना जिंकला तर भारत आणि बांगलादेश असा क्वार्टर फायनलचा २१ मार्च रोजी वेलिंग्टन येथे होण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.