प्रिती झिंटा - ललित मोदी संबंधाबाबत एक मोठा खुलासा

आयपीएलमधील पंजाब टीमची मालक अभिनेत्री प्रिती झिंटा आणि आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी संबंधाबाबत एक मोठा खुलासा झालाय. याबाबत एक  ई-मेल लीक झालाय.

Updated: Sep 18, 2015, 03:05 PM IST
प्रिती झिंटा - ललित मोदी संबंधाबाबत एक मोठा खुलासा  title=
छाया - पीटीआय

नवी दिल्ली : आयपीएलमधील पंजाब टीमची मालक अभिनेत्री प्रिती झिंटा आणि आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी संबंधाबाबत एक मोठा खुलासा झालाय. याबाबत एक  ई-मेल लीक झालाय.

आयपीएलमधील तीन टीमसाठी लाभदायक निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. यात ललित मोदी आणि त्यांचा भाऊ समीर मोदी तसेच ऑस्ट्रेलियातील एक वकील यांनी एक मेल १९ मेला पाठवला होता. ई-मेलबरोबर ट्रस्टचा काही दस्तऐवज मुसदाही पाठविला गेल्याचे पुढे आलेय.

दरम्यान, या तीन टीमचा खुलासा झालेला नाही. मात्र, इंग्रजीपत्राच्या वृत्तानुसार ई-मेलनुसार ललित मोदी, किंग्स इलेव्हन पंजाबची सहमालक प्रिती झिंटा आणि अन्य शेअरधारक आणि ललित मोदी यांच्यासाठी काम करणारे संजीवन साहनी यांच्यामधील संबंधाबाबत मोठा खुलासा झालाय.

प्रिती झिंटाने २१ नोव्हेंबर २०१४ रोजी ललित मोदी यांना ई-मेल केला होता. यात तिने एका डिलबाबत लिहिले होते, हाय ललित, तुमच्या माहितीसाठी, पुढच्या आठवड्यात डिल अंतिम करा. ( फॉर योर इन्फॉर्मेशन, अगले हफ्ते हम पेपरवर्क निपटाकर डिल केले फायनल टाइमलाइन तय कर लेंगे.) तुमच्या विचाराची वाट पाहत आहे. तोपर्यंत डिल होणार नाही. तसेच याबाबत कोणाला माहिती होणार नाही. एक व्यक्ती डिल करण्याबाबत तिसऱ्या पार्टीकडे पैसे जमा करण्यास राजी आहे. आता मला हे डिल पूर्ण केले पाहिजे.

प्रिती झिंटाने हा मेल मोहित बर्मन, गौरव बर्मन, कपिल खन्ना आणि नेस वाडिया यांनाही पाठविला होता. ललित मोदीनी याला उत्तर दिले. २२ नोव्हेंबरला साहनी यांनी मेल केला आणि टीमच्या विक्रीसाठी तयार राहा. तुम्ही मोहितशी बोला.

याबाबत किंग्ज इलेव्हनच्या प्रवक्त्याने सांगितले, आम्हाला याबाबत माहिती मिळाली होती. तसेच आलेल्या मेलबाबत सामान्य चौकशी केली जास्त काहीही नाही. ललित मोदी यांची पंजाब टीममध्ये कोणतीही भागिदारी नाही. मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि करण पाल यांची भागिदारी आहे. आयपीएल प्रमुख या नात्याने ललित मोदी आम्ही सहमालक असल्याचे माहित होते. यामुळे एका प्रस्तावाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.