नवी दिल्ली : टीम इंडियाचा नव्या कोचच्या इंटरव्ह्यूची प्रोसेस आता अंतीम टप्प्यात आहे. या रेसमध्ये रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांचे नाव सर्वात पुढे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकता येथे सुरू असलेल्या निवड प्रक्रियेत रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे आपआपली दावेदारी सादर करणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI)सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्या सल्लागार समितीसमोर हा विषय ठेवण्यात आला आहे.
यात एक बातमी समोर येत आहे की टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीकडे कोच पदासंदर्भात सल्ला मागितला आहे. कोहलीने कोचच्या नावासाठी टीम इंडियाचा माजी डायरेक्टर रवी शास्त्रीच्या नावाचे समर्थन केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोहलीने शास्त्रीचे नाव अशा वेळी पुढे केले, ज्यावेळी धोनीने कुंबळेच्या नावावर शिक्कामोर्तब केले. हरभजननेही कुंबळेच्या नावाला पसंती दिली होती.
विराट कोहलीला टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. त्यामुळे कोहलीने केलेली शिफारशीमुळे त्यांची रवी शास्त्री यांची दावेदारी मजबूत होत आहे.
यापूर्वी रवी शास्त्री यांनी विराटला तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार बनवावा अशी शिफारस केली होती.