पुण्यात असलेला कोहली त्यांना भेटला

आयपीएलमध्ये धोनीच्या पुण्याचा सामना कोहलीच्या बंगळूरुविरुद्ध होणार आहे.

Updated: Apr 22, 2016, 08:22 AM IST
पुण्यात असलेला कोहली त्यांना भेटला title=

पुणे: आयपीएलमध्ये धोनीच्या पुण्याचा सामना कोहलीच्या बंगळूरुविरुद्ध होणार आहे. शुक्रवारी पुण्यामध्ये हा सामना होईल. या सामन्याआधी कोहलीची सामाजिक बांधिलकी पाहायला मिळाली. 

पुण्यामध्ये असलेल्या आभाळमाया या वृद्धाश्रमाला कोहलीनं भेट दिली. या भेटीचा फोटो कोहलीनं शेअर केला आहे. जेव्हा वेळ होईल तेव्हा समाजासाठी खुल्या दिलानं काहीतरी द्या, असं कोहली म्हणाला आहे.